जळगाव लाईव्ह न्यूज । देशात मागच्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे आहेत. सध्या पेट्रोलचे दर १०६ रुपयापर्यंत तर डिझेल ९२ रुपयांवर विकले जात आहेत. सर्वसामान्य वाहतूकदार इंधनाचे दर कधी कमी होतील याची प्रतीक्षा करीत आहे. अशातच सर्वसामान्यांना दिलासा मिळणारा अंदाज समोर आला आहे. पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती या पाण्यापेक्षा कमी होऊ शकतात. जागतिक एजन्सी जेपी मॉर्गनने याबाबत भविष्यवाणी केली आहे. येत्या दोन वर्षात कच्चे तेल खूप स्वस्त होणार आहे. २०२७ पर्यंत ब्रेंट क्रूड ऑइलचे दर ३० डॉलर प्रति बॅरल होऊ शकतात.

भारतीय रुपयानुसार कच्च्या तेलाचे दर ९५ रुपये प्रति बॅरल होईल. एका बॅरलमध्ये १५९ लिटर कच्चे तेल असते. एका बॅरलची किंमत २८५० रुपये होईल. त्यामुळे एका लिटर कच्च्या तेलाची किंमत १७.९० रुपये होऊ शकते. हे दर एका पाण्याच्या बॉटलपेक्षा कमी आहे. पाण्याची बॉटल ही १८ ते २० रुपयांना मिळते.

जेपी मॉर्गनच्या अंदाजानुसार, कच्च्या तेलाचे हे दर भारतासाठी महत्त्वाचे आहे. भारत देश हा कच्च्या तेलावर अवलंबून आहे. भारत ८६ टक्के कच्चे तेल हे इतर देशांकडून घेतो. जेपी मॉर्गनच्या अंदाजानुसार, ब्रेंट क्रूडच्या किंमती या ५० टक्के कमी होऊ शकतात. सध्या ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल ६२ डॉलरवर विकले जात आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त असणे हे कच्च्या तेलाच्या घसरणीमागचे कारण असू शकते. जेपी मॉर्गनचा हा अंदाज जर खरा ठरला, तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी कपात होऊन सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
भारत आपल्या गरजेपैकी सुमारे ८६% कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे, तेलाच्या किमतीत झालेली ही मोठी घसरण भारताचे आयात बिल कमी करण्यास आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत करू शकते.



