जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२४ । तेल कंपन्यांनी 23 जून रोजी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. गेल्या काही महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मार्च महिन्यात कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी २ रुपयांनी कपात केली होती. त्यानंतर दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कमी झाल्यावरच किमतीत बदल दिसून येतो.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर
जळगावत पेट्रोलचा दर 105.56 रुपये, तर डिझेलचा दर 91.96 रुपये आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर 104.21 रुपये आहे. डिझेलचा दर 92.15 रुपये आहे.
दिल्लीत पेट्रोलचा दर 94.72 रुपये, तर डिझेलचा दर 87.62 रुपये आहे
कोलकात्यात पेट्रोलचा दर 103.94 रुपये आणि डिझेलचा दर 90.76 रुपये आहे
चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 100.75 रुपये आणि डिझेलचा दर 92.32 रुपये आहे.
पाटणामध्ये पेट्रोलचा दर 105.18 रुपये तर डिझेलचा दर 92.04 रुपये आहे.
देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सारख्या कंपन्या त्यांच्या वेबसाइटवर दररोज नवीन किंमती जाहीर करतात. येथे तुम्ही घरबसल्या तेलाच्या किमती तपासू शकता.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लागू करण्याची मागणी जोर धरत आहे. अशातच पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाबाबत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वाचे विधान केलं. त्यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकार या निर्णयासाठी तयार आहे, परंतु राज्यांनी यावर निर्णय घेणे बाकी आहे. त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला एकत्रितपणे निर्णय घ्यावा लागणार आहे.