जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२२ । गेल्या आठवड्यात केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे पेट्रोल (Petrol Price) प्रति लिटर साडेनऊ रुपये तर डिझेल प्रति लिटर सात रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र त्यानंतर सलग सहा दिवस पेट्रोल, डिझेच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाहीय. आज शुक्रवारी देशांतर्गत पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel) नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार इंधन दर जैसे थे आहे. त्यामुळे जळगावात पेट्रोल ११२. १९ रु. प्रति लिटर तर डिझेल ९७.३४ रु.प्रति लिटर पर्यंत विकले जात आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात तेजी दिसून येत आहे. आज कच्चे तेल 115 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. एकीकडे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र दुसरीकडे भारतात पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करण्यात आल्याने हा सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा ठरला आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील दर
मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.92 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.25 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.73 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 112.97 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 98.89 रुपये एवढा आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.54 इतका आहे. ठाण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.78 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.25 रुपये इतका आहे.