जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । देशांतर्गत पेट्रोलियम कंपन्यांकडून आज गुरुवारी 26 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel) नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. काही दिवसापूर्वी केंद्राने केलेल्या दर कपातीनंतर जनेतला काहीसा दिलासा मिळाला आहे.
केंद्राच्या दरकपाती नंतर अनेक राज्यांनी इंधन दरावरील व्हॅट कमी करून दिलासा दिला. मात्र अद्यापही महाराष्ट्रातील सरकारकडून याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाहीय. त्यामुळे आता राज्य सरकार इंधन दर कमी करून राज्यातील जनतेला दिलासा देणार का? हे पाहणे गरजेचे आहे.
आज कंपन्यांकडून जाहीर झालेल्या दरानुसार जळगावात पेट्रोल ११२. १९ रु. प्रति लिटर तर डिझेल ९७.३४ रु.प्रति लिटर पर्यंत विकले जात आहे. तर राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 108.87 रुपये आहे तर डिझेलचा भाव प्रति लिटर 94 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 110.95 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.51 रुपये इतका आहे.