जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ ऑगस्ट २०२१ । आज रविवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा दर स्थिर आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव ७५ डॉलर नजीक असला तरी तूर्त कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. आज सलग १५ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भाव ‘जैसे थे’च आहे. जळगावात आजचा एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.९८ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९७.०८ रुपये इतका झाला आहे.
जळगाव शहरात गेल्या ६ महिन्यापूर्वी २५ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोलचे दर ९३.४७ रूपये तर डिझेल ८२.५६ प्रति लिटर मिळत होते. त्यात जुलै २०२१ मध्ये प्रचंड वाढ झाली असून ६ महिन्यात पेट्रोलचे दर १५ रूपये ५१ पैशांनी तर डिझेलचे १४ रूपये ५२ पैसे प्रति लिटर वाढले आहेत.
देशातील मोठ्या शहरातील दर
मुंबईत आजचा एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.४९ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे.
मुंबईत आज रविवारी डिझेलचा भाव ९७.४५ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये आहे. चेन्नईत ९३.६३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.०२ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.६७ रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.२६ रुपये आहे.