जळगाव लाईव्ह न्यूज । मागील गेल्या काही महिन्यांपासून देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) जैसे थे आहेत. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. आज 3 जानेवारी रोजीचे इंधनदर सुधारले आहेत. तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले जातात. आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती खाली सविस्तर दिल्या आहेत. Petrol Diesel Price Today
महाराष्ट्रातील इंधनदर
महाराष्ट्रात आज पेट्रोलची सरासरी किंमत 104.68 रुपये प्रतिलिटर आहे. मागच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 डिसेंबररोजी पेट्रोलची सरासरी किंमत 104.89 रुपये प्रति लिटर होती, त्या तुलनेत आता किंमत 0.21 टक्क्यांनी कमी झाली आहे.
तर, डिझेल 91.21 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. काल 2 जानेवारीरोजी देखील महाराष्ट्रात डिझेलची किंमत सारखीच होती. म्हणजेच डिझेलच्या दरात कालपासून कोणताही बदल झाला नाही.(Petrol-Diesel Price Today)
मागील 5 दिवसांचा विचार केल्यास महाराष्ट्रात 29 डिसेंबर 2024 रोजी डिझेल 91.42 प्रति लिटर होते. 30 डिसेंबररोजी 91.29, 31 डिसेंबररोजी 91.21 तर नववर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2025 रोजी 91.21 आणि आजदेखील भावात कोणतेच बदल झाले नाही. आजही डिझेल 91.21 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे.