आजचे पेट्रोल आणि डीझेलचे दर जाहीर ; जाणून घ्या नवे दर
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२१ । गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर पडत आहे. देशातील तेल कंपन्यांनी नुकतंच पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहे. गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज शुक्रवारी मात्र त्यात कोणाताही बदल झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
देशभरातील विविध शहरांमधील काल पेट्रोलची किंमत 18 ते 25 पैसे प्रतिलीटर तर डिझेलच्या किंमतीत 28 ते 32 पैसे प्रतिलीटरने वाढ झाली होती. आज मात्र हे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र महाराष्ट्रातील बहुतांश शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर डिझेलच्या दराने नव्वदी पार केली आहे.
दरम्यान, जळगावमध्ये पेट्रोल प्रति लिटर १००.८६ इतका आहे. तर डीझेल प्रति लिटर ९१.२८ इतका आहे. तर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९९.९४ रुपयांवर झाला आहे. तर डिझेलचा भाव ९१.८७ रुपये आहे. धुळे मध्ये पेट्रोलचा भाव ९९.६१ रुपये इतका आहे. तर एक लीटर डिझेलचा भाव ९०.०८ आहे. नंदुरबारमध्ये पेट्रोल १००.४५ रुपये प्रतिलिटर आहे. तर डीझेल ९०.८९ रुपये आहे.