जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२१ । राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात महागाईचा भडका उडालेला दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. सततच्या भाव वाढीने जळगावमध्ये पेट्रोल इतिहासात पहिल्यांदा १०० च्या वर गेले आहे.
दरम्यान, आज मंगळवारी पेट्रोल आणि डीझेलच्या दरात किंचित घट झाली आहे. आज पेट्रोल १६ पैशांनी स्वस्त झालं आहे. तर डीझेल १७ पैशांनी स्वस्त झालं आहे. दरम्यान, जळगावकरांना एक लिटर पेट्रोलकरीता १०४.२१ रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलसाठी रुपये ९४.८१ प्रति लिटर झाले आहे.
जळगावमध्ये जून २०२१ च्या सुरवातीला पेट्रोलचा दर १०१.३३ रुपये प्रति लिटर होता. तो आज १०४.२१ रुपये पर्यंत आहे. गेल्या २१ दिवसात पेट्रोल तब्बल ३ रुपयाने वाढले आहे. तर याच महिन्याच्या सुरुवातील डीझेल ९१.८६ रुपये प्रति लिटर होते. ते आज ९४.८१ प्रति लिटर झाले आहे. डीझेलमध्ये देखील गेल्या २१ दिवसात ३ रुपयाची वाढ झाली आहे.
वर्षाच्या सुरुवातीला पेट्रोल ९१.५८ रुपये तर डिझेल ८०.९० प्रतिलिटर होते. त्यानंतर १ फेब्रुवारीला पेट्रोल ९४.०६ रुपये, १ मार्चला ९८.६१ रुपये राहिले. ही दरवाढ कायम राहत अखेर मे महिन्याच्या मध्यांतरात म्हणजे १६ मे रोजी पेट्रोलने शंभर रुपयांचा आकडा पार करीत १००.१० रुपये प्रति लिटरवर ते पोहचले.