⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | वाणिज्य | पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर ; २० सप्टेंबर २०२१

पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर ; २० सप्टेंबर २०२१

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ ।  देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. देशातील पेट्रोलियम कंपन्यांकडून सलग 15व्या दिवशी म्हणजेच, 20 सप्टेंबर 2021 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, तज्ज्ञांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत देशात पेट्रोलच्या किमतींमध्ये मोठी घट होऊ शकते.

गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाचे दर सातत्याने वाढत असल्याने भारतामध्येही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, तरीही भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सलग 15 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत.

गेल्या ५ सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी इंधन दरात १५ पैशांची सवलत दिली होती. यानंतर सलग दर स्थिर आहेत. जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.५२ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९५.९४ रुपये इतका आहे. दरम्यान तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन लेटेस्ट इंधनाचे दर तपासू शकता.

काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर?

>> दिल्ली पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 88.62 रुपये प्रति लीटर

>> मुंबई पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर

>> चेन्नई पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लीटर

>> कोलकाता पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर

>> नोएडा पेट्रोल 98.52 रुपये आणि डिझेल 89.21 रुपये प्रति लीटर

>> जयपूर पेट्रोल 108.17 रुपये आणि डिझेल 97.76 रुपये प्रति लीटर

>> भोपाळ पेट्रोल 109.63 रुपये आणि डिझेल 97.43 रुपये प्रति लीटर

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.