त्रिपुरा जातीय दंगल पार्श्वभूमीवर चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्ये शांतता समिती बैठक
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । त्रिपुरा मध्ये झालेल्या हिंदू, मुस्लिम घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून, चाळीसगाव शहरात कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, सोशल मीडियावर आलेले फोटो व्हिडीओ मेसेज व्हायरल व कॉमेंट करू नका, शहरात कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला नाही. यापुढे ही असा प्रश्न ? निर्माण होऊ नये, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये शांतता समिती बैठक आज रोजी दुपारी आयोजित करण्यात आली यावेळी केले.
यांची उपस्थिती होती
बैठकीतस आमदार मंगेशदादा चव्हाण, जिल्हा बँक संचालक प्रदिपदादा देशमुख, डी. वाय. एसपी. कैलास गावडे, पोलीस निरीक्षक के. के. पाटील, स.पो.नि.सचिन कापडणीस, नायब तहसीलदार ढोले, माजी नगरसेवक प्रशांत देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख रमेश चव्हाण,
नगरसेवक राजेंद्र चौधरी, रामचंद्र जाधव, आण्णा कोळी, बापू अहिरे, बंटी ठाकूर, शिवसेना तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, माजी सरपंच अमोल भोसले आदी शांतता समिती सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, प्रास्ताविकात पोलीस निरीक्षक म्हणाले की, त्रिपुरा जातीय घटनेत जळगाव जिल्ह्यात जे पडसाद उमटले पोलीस अधिक्षक साहेबांनी चाळीसगाव शहराचे नाव घेतले नाही ही, अभिमानाची बाब आहे. त्रिपुरा राज्यात जी घटना घडली त्याचे पडसाद राज्यभर उमटले मात्र, चाळीसगाव मध्ये शांतता आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ नये, सोशल मीडियावर आलेले फोटो, व्हिडीओ, मेसेज व्हायरल व कॉमेंट करू नका, शहरात कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला नाही. यापुढे ही असा प्रश्न निर्माण होऊ नये, याची दक्षता घ्यावी, तसेच पोलीस पाटील यांनी देखील ग्रामीण भागात ग्रामस्थांना याबाबत माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा बँक संचालक प्रदीप दादा देशमुख यांनी सांगितले की, चाळीसगाव मध्ये जातीय सलोखा कायम आहे. याठिकाणी जातीय तेढ निर्माण होणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल मेसेज अर्ध्यावर फेक असतात. त्याला जनतेने बळी पडू नये, अशा परिस्थितीत आपण शासन प्रशासनला मदत करू असे आवाहन करत आजपर्यंत चाळीसगाव मध्ये जातीय वातावरण बिघडू दिले नाही. कायदा सुव्यवस्था बाबत चाळीसगाव वासीय व शांतता समिती चे सर्व सदस्य एकोप्याने काम करून प्रशासनाला सहकार्य करतील असे सांगितले. तर चाळीसगाव तालुका शहर हे शांततेचे प्रतीक असून, याठिकाणी सर्वच समाजबांधव गुण्यागोविंदाने राहत असून, आजूबाजूच्या तालुक्याला काहीही घटना घडल्या त्याचे गालबोट तालुक्याला लागणार नाही. पोलीस प्रशासनाने चांगले काम केले आहे. याचे कौतुक पण नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी केले. कैसर खाटीक म्हणाले की चाळीसगाव शहरात हिंदू मुस्लिम बांधव कायम एकत्र राहतील असे सांगितले.
डी.वाय.एस.पी. कैलास गावडे म्हणाले की, आमच्या गृप कॉल मध्ये एस.पी साहेब यांनी जिल्ह्यातील काही तालुक्यांची चिंता व्यक्त केली मात्र, चाळीसगाव विभागाबद्दल बद्दल समाधान व्यक्त केले. चाळीसगाव वर दाखवला विश्वास आपण सार्थ ठरवला पाहिजे. सर्वांनी शांतता राखावी सण उत्सव एकोप्याने साजरे केले तशीच शांतता ठेवावी असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, राज्यात वादळ पेटवले जाते तशी घटना त्रिपुरात घडली नाही. काही ठराविक घटक राजकीय तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत. समाजात वाद, तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आज समाजाच्या नावावर डोके भडकावून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. चाळीसगाव शहर तालुक्यात जातीय एकोपा आहे तो कायम राहील. असा कुठलाही प्रकार घडू नये म्हणून, आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. चाळीसगाव मध्ये कुठल्याही दोन समाजात वाद नाहीत. गावात काही प्रवृत्ती डोके वर काढायला लागल्या आहेत त्यांना वेळीच आवरले पाहिजे. चाळीसगावचे पोलीस व महसूल अधिकारी खूप चांगले काम करीत आहेत. मुसाकादरी बाबांची तलवार मिरवणूक हिंदू बांधवाच्या घरून निघते हिंदू मुस्लिम बांधव यात मोठया प्रमाणात सामील होतात. असाच समाज एकोपा आपल्याला कायम ठेवला लागेल चाळीसगाव मध्ये हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने राहतात हा एकोपा कायम राहील असे त्यांनी सांगितले.