⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | नोकरी संधी | पाटबंधारे विभाग जळगाव येथे भरती २०२१

पाटबंधारे विभाग जळगाव येथे भरती २०२१

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटबंधारे विभाग जळगाव येथे शाखा अभियंता पदाच्या एकूण ४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव – शाखा अभियंता

शैक्षणिक पात्रता – Retired Officer from Water Resources Department

नोकरी ठिकाण – जळगाव

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव गिरणा कॉलनी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2021

अटी :

१) अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी ज्या पदासाठी अर्ज केले आहे त्या पदाच्या विवक्षीत कामासाठी लागणारी विशेष अर्हता व किमान तीन वर्षाचा अनुभव असो आवश्यक आहे.

२) सदर नेमणूका हया एक वर्षच्या कालावधीसाठी आहत. एक वर्षापेक्षा जास्त कालावधी वाढवीण्याची आवश्यकता भासल्यास नियुक्ती अधिकारी शासन मान्यतेने तसा निर्णय घेवू शकता

३) करार पध्दतीने नियुक्ती देण्यांत आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही विभागात /संवर्गात सेवा समावेशना बाबत किंवा सामावून घेण्या बाबत वा नियमीत सेवचा इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार/हक्क नसेल याबाबत अर्जदाराने रु.१००/- च्या स्टॅम्पवर प्रतिज्ञालेख देणे बंधनकारक राहिल.

४) नियुक्ती प्राधिकारी यांना कोणत्याही वेळी करार पध्दतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार. राहतील

५) सदर अधिकारी त्यांच्यावर सोपविलेल्या पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही कामात गुंतलेला नसावा. अशा अधिकारी यांनी Conflict of interest जाहीर करणे आवश्यक राहील.

६) करार पध्दतीने नियुक्त झालेल्या अधिकारी यांना आवश्यक प्रसंगी दौरा करावा लागल्यास त्यांना त्यांच्या निवृततीच्या वेळच्या वेतनमानास अनुसरुन प्रवासभत्ता व दैनिक भत्ता अनुज्ञेय राहील.

७) अशा कराक पध्दतीवरील अधिकारी यांनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे/माहिती कामा बाबत व आधारसामग्री बाबत गोपनियता पाळणे बंधनकारक राहील.

८) नियुक्ती अधिकारी यांनी त्यांच्यावर सोपविलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहीत. करार पध्दतीने नियुक्त झालेल्या अर्जदारास नेमूण दिलेले काम समाधान कारक नसल्यास कोणतेही सबळ कारण न देता त्यांची सेवा समाप्त करण्यांत येईल.

९) अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी यांनी शेवटच्या ५ वर्षांच्या गोपनिय अहवालाची प्रतवारी संबंधित पुर्यालयाकडून प्रमाणित करुन तसे प्रमाणपत्र सादर करावे. तसेच प्रशस्तीपत्र / नैपुण्या काम केले असल्यास तसे प्रमाणपत्र अर्जा सोबत जोउण्यांत यावे.

१०) क्षेत्रिय स्तरावर करार पध्दतीने नियुक्त झालेल्या अर्जदारास सेवाकाळामध्ये काही नैसर्गिक अपघात व काही आजार उद्भवल्यास कोणत्याही परिस्थितीत कार्यालय शासन त्यास बांधील जबाबदार राहणार नाही.

११) अर्ज करतेवेळी सेवानिवृत अधिकारी यांनी त्यांचे कुटुंब निवृत्ती वेतन मंजूरीचे महालेखापाल कार्यालयाचे आवश्यक दस्तऐवज सादर करावेत

जाहिरात (Notification) PDF

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.