जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, जळगाव येथे पालक सभा उत्साहात पार पडली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्यासह अधिष्ठाता तसेच तंत्रनिकेतनच्या सर्व विभागांचे प्रमुख त्याचप्रमाणे प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.
सुरुवातीला सरस्वती पूजन व गोदावरी आजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सभेत उपस्थित पालकांना संबोधित करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक वाटचाल, अद्ययावत भौतिक व तांत्रिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या उच्चशिक्षित व अनुभवी अध्यापकवर्गाबाबत सविस्तर माहिती दिली.

पालकांच्या अपेक्षा, जागरूक पालकांची भूमिका आणि पालक सभेचे शैक्षणिक महत्त्व याविषयी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले.यानंतर विविध विभागांतील प्राध्यापकांनी पालकांशी संवाद साधत विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, उपस्थिती, शिस्त, प्रगती अहवाल व करिअर संधी याबाबत मार्गदर्शन केले. पालकांनी व विद्यार्थ्यांनी देखिल मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

समन्वयन प्रा. दीपेश भुसे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. सरला सोनवणे केले. पालक सभेच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील(सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.





