जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२१ । देशभरात पेट्रोल, डीझेलसह जीवनावश्यक वस्तूच्या किंमती भरमसाठ वाढल्या असून यामुळे सामान्य नागरिक हा त्रासला आहे. वाढत्या इंधन आणि जीवनावश्यक वस्तूच्या किंमतीच्या विरोधात आज पाचोरा शिवसेना व शिवसेना महिला आघाडीतर्फे पाचोरा तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकार इंधन आणि जीवनावश्यक वस्तूची जी दरवाढ करत असून त्यामुळे सामान्य नागरिक हा त्रासला आहे आणि अशा कठीण परिस्थितीत सामान्य नागरिक हा थोडीशी कमाई कुठे कुठे खर्च करेल. घरचे कसे भागवेल असे अनेक प्रश्न या निवेदनात देण्यात आले आहे.
याची होती उपास्थिती
याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर, मुकुंद बिल्धीकर, प्रवीण ब्राम्हणे, हरिभाऊ पाटील, रवीद्र मराठे, टिल्लू आप्पा, विजय भोई
शिवसेना महिला आघाडी -मंदाताई पाटील, सुनंदा महाजन उर्मिला शेळके, किरण पाटील, रेखा राजपूत, स्मिता बारवकर हे उपस्तित होते.