---Advertisement---
गुन्हे पाचोरा

पाचोऱ्यात तोंडावर मास्क लावा सांगितल्याच्या रागातून न.पा.च्या कर्मचाऱ्याला मारहाण ; नगरसेवकासह तिघांवर गुन्हा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करतांना तोंडावर मास्क लावा सांगितल्याच्या रागातून नगरपालिका कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक बागवानसह तिघांवर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा येथे कोरोना महामारीची साकळी तोडण्यासाठी पालिका प्रशासन व पोलिस शहरात संयुक्त कारवाई करीत आहे. या पालीका प्रशासनाने राजेंद्र उर्फ अनिल फकिरा वाघ या सह तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.२६ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात रफिक बागवान या नगरसेवकाने तोंडावर मास्क न लावता भाजीपाला विक्री  सुरू ठेवली होती  त्यास पालिका कर्मचारी राजेंद्र उर्फ अनिल फकिरा वाघ याने आपण तोंडावर मास्क लाऊन आपले काम करा असे सांगीतले होते.

---Advertisement---

त्यांनतर दोन दिवसांनी अनिल वाघ, राजेश कंडारे, पोलिस उपअधीक्षक विकास पाटील, सहाय्यक फौजदार नंदकुमार जगताप, प्रकाश पाटील, सुनिल पाटील, विजयसिंग पाटील हे दि.२८ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्तव्य बजावत असतांना त्या ठिकाणी नगरसेवक रफिक बागवान, महिद बागवान यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करुन राजेंद्र उर्फ अनिल फकिरा वाघ याचा हात घरुन  युसुफ कालू बागवान याचेवर दंडात्मक कारवाई का केली. तूला येथे नोकरी करावयाची आहे का नाही. तू हे चांगले केले नाही. तू पोलिसांच्या नांदी लागू नको, ते आज आहेत, उद्या नाहीत असे बोलून ज्या ठिकाणी कारवाई केली होती त्या ठिकाणी घेऊन गेले व भाजीमंडीतील युसूफ बागवान यास बोलावून यांने तूझ्यावर कारवाई केली का? असे विचारले व युसुफ बागवान याने हो सांगीतल्यानंतर नगरसेवक रफिक बागवान याने राजेंद्र उर्फ अनिल फकिरा वाघ याचे तोंडावरील मास काढून फेकले. व हातातील पावतीबुक फेकून दिले.

त्यानंतर तिघांनी तोंडावर व छातीवर बुक्यांनी मारहाण केली. ते अनिल वाघ हे ओक्साबोक्शी रडत असतांना तोंड दाबून ठेवले आणि शिवीगाळ करून दमदाटी केली. यावेळी माझे सोबत इतर दुकानावर कारवाई करीत असलेले सहाय्यक फौजदार नंदकुमार जगताप, सुनिल पाटील, विजयसिंग पाटील यांनी त्यांचे तावडीतून सोडविले, यामुळे पालिका कर्मचारी वाघ याने नगरसेवक रफिक बागवान यांचेसह तिघांवर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच नगरसेवक रफिक बागवान यांना अटक करण्यात आली आहे.युसूफ बागवान,हमीद कालु बागवान, बेपत्ता आहेत. नगरसेवक रफिक बागवान याच्यावर कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय कर्मचारी याना मारहाण व शासकीय कामत अडथळा निर्माण केल्या प्रकरणी. शासकीय कर्मचारी अनिल वाघ यांनी पाचोरा पोलीस स्टेशन येथे दाखल केलेल्या तक्रारी नुसार आरोपी वरती कलम -353,332,504,506(34),268,269. नुसार कारवाई करण्यात आली आहे व पाचोरा पोलीस स्टेशन चे ‘पी. आय ‘ किसनराव नजन पाटील -जर कोणी शासकीय कर्मचाऱ्या सोबत असे कृत्य केल्यास सक्त कारवाई केली जाईल

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---