---Advertisement---
पाचोरा भडगाव

पाचोरा-भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ मदत द्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२१ । पाचोरा-भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ मदत द्यावी या मागणीसाठी आज आमदार कीशोर पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्याप्रमाणे त्यांनी ही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले.

New Project 10 1 jpg webp

गेल्या महीन्यात पाचोरा-भडगाव तालुक्यात मोठ्याप्रमात अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामावर पुर्णपणे पाणी फीरले आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदत द्यावी अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी

---Advertisement---

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. दरम्यान आमदार किशोर पाटील यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेत नुकसान भरपाई देण्याबाबत मागणी केली होती.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---