⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | पाचोऱ्याचा जवान पठाणकोट येथे चकमकीत शहीद

पाचोऱ्याचा जवान पठाणकोट येथे चकमकीत शहीद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील सावखेडा बु. येथील जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी हे शनिवारी मध्यरात्री पठाणकोट (पंजाब) येथे झालेल्या चकमकीत शहिद झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या सोमवार रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

पठाणकोट (पंजाब) येथे शनिवारी मध्यरात्री कर्तव्यावर असतांना झालेल्या चकमकीत मंगलसिंग परदेशी हे जवान शहिद झाले आहे. ते शहीद झाल्याचे वृत्त सावखेड्यात धडकताच सावखेडा बु”, सावखेडा खु”, वरखेडी, डांभुर्णी, मोंढाळे ( ता.भुसावळ) सह परीसरावर शोककळा पसरली आहे. सावखेडा गावी घटनेची माहिती मिळताच मोठा जनसमुदाय लोटला होता. घरी वृद्ध आई – वडील, दोन भावंडासह नातेवाईक व गावकऱ्यांनी आक्रोश केला.

शहिद जवान मंगलसिंग परदेशी यांचे पार्थिव सोमवारी पठाणकोट येथून विमानाने औरंगाबाद येथे आल्यानंतर तेथुन लष्कराच्या वाहनातून गावी आणण्यात येणार आहे. सोमवारी सायंकाळी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

पाचोरा शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरच्या सावखेडा बु. येथील जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (वय ३५) हे सन २००५ मध्ये अलीबाग येथे भारतीय सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांनी सिकंदराबाद येथे प्रशिक्षण घेतले होते. सन-२०१४ मध्ये त्याचा मोंढाळे ( ता.भुसावळ) येथील मुलीशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुली व एक मुलगा असे तीन अपत्य आहेत. ते पत्नी व कुटुंबासह सोबतच राहत होते.

जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेली माहिती :

सावखेडा, ता. पाचोरा, जि. जळगावचे सुपुत्र, 734 TPT WKSP मध्ये कार्यरत जवान नायक मंगलसिंग जयसिंग परदेशी यांचे आज दिनांक 14 नोव्हेंबर, 2021 रोजी पहाटे 1.40 वाजता पठाणकोट येथे बंदुकीची गोळी लागल्यामुळे निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव सोमवार, दिनांक 15 नोव्हेंबर रोजी पठाणकोट येथून विमानाने दुपारी 4.00 वाजता मुंबई येथे येईल. तेथुन ॲम्बुलसने त्यांचे मुळगाव सावखेडा, तालुका पाचोरा येथे मंगळवार, 16 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 6 वाजे दरम्यान पोहचेल. त्यानंतर त्यांचेवर सकाळी 9:30 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल. अशी माहिती जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे वेल्फेअर अधिकारी अनुरथ वाकडे यांनी दूरध्वनीवरून दिली आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.