⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

अस्मानी संकटावर मात करत केळीला मिळाला विक्रमी भाव : प्रती क्विंटल मिळाले इतके रुपये

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । संपूर्ण जिल्ह्याला वादळ वाऱ्याने झोडपून काढलेल असताना सुद्धा अस्मानी संकटावर मात करत केळीला मिळाला विक्रमी भाव मिळाला आहे. बऱ्हाणपूर बाजारात गुरुवारी केळीला अतिशय चांगला भाव मिळाला. २६९५ ते २७०० रूपये प्रतिक्विंटल भावाने केळीचा लिलाव झाला. गेल्या १० वर्षातील हा सर्वाधिक भाव असल्याचे सांगितले जात आहे. या उच्चांकी भावाने केळी उत्पादकांना सुखद धक्का बसला आहे.

जळगाव जिल्हा संपूर्ण राज्यासह देशात केळी उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जळगाव जिल्ह्यातील केळी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. जळगावात निर्माण होणारे परिणाम जगभरात मोठी मागणी असते हीच मागणी ओळखून जळगाव जिल्ह्याचे शेतकरी केळी मोठ्या प्रमाणावर उगवतात. ती बाजारपेठेत जाऊन विकतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून जून महिन्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले केळीचे पीक हे झोपल जात आहे. या काळात शेतकऱ्यांनी कित्येकदा आत्महत्या करा याचा देखील विचार केला आहे. मात्र अशावेळी या अस्मानी संकटावर मात करत जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी तब्बल २७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला असल्याने शेतकरी राजा खूश झाला आहे.

मागच्या वर्षी कुकुंबर मेझोक व्हायरसमुळे शेतकरी राया बेजार झाला होता. स्वतःच्या अख्खाच्या अख्खा केळीच्या बागा त्याला उपटून फेकून द्याव्या लागल्या होत्या. यामुळे केळी लागवडीत मोठी घट पाहायला मिळत होती. यंदा वादळामुळे तर रावेर तालुक्याला इतकं झोडपलं कि केळी बागा अक्षरशहा जमीनदोस्त झाल्या. मालाचे मोठे नुकसान झाले. मात्र ह्याच मुळे केळी मलाची आवक ही कमी झाली आणि याची मागणी वाढली.

अर्थशास्त्राचा नियम की जेव्हा एखाद्या गोष्टीची मागणी वाढते आणि आवक कमी होते तर त्या गोष्टीचा भाव सहाजिकच वाढतात आणि याच नियमानुसार यंदा विविध अस्मानी संकट म्हणा किंबहुना कुटुंब व्हायरस सारखं इतर रोगाच संकट या संकटामुळे केळी मालाची आवक घटली आणि उपलब्ध असलेल्या केळी बाजारपेठेत मोठ्या मागणीमुळे मोठ्या भावात विकला गेल्या. परिणामी जळगाव जिल्ह्यातला शेतकरी केळी पिकासंदर्भात सुजलाम सुफलाम झाला ज्यामुळे त्याला मोठा भाव मिळाला

देशभरात सध्या केळीची आवक फारच कमी झाली आहे. खान्देश व निमाड प्रांतातील केळी जेमतेम उपलब्ध आहे. गतवर्षी कुक्कुंबर मोझॅक व्हायरसमुळे शेतकऱ्यांनी केळीबागा उपटून फेकल्या होत्या. त्यामुळे | लागवडीत मोठी घट झाली होती. यंदा वादळामुळे रावेर तालुक्यातील अनेक ठिकाणच्या केळीबागा जमीनदोस्त झाल्या. केळीमालाची आवक कमी आणि मागणी मोठ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी चक्राकार पध्दतीने केळी लागवड केल्यास भविष्यातही असाच चांगला भाव शेतकऱ्यांना मिळेल, अशी आशा आहे.