Crime News-जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । डोळ्यात औषध टाकण्याच्या बहाण्याने ६० वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकणी नशिराबाद पोलिसांत वृद्धा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर असे की, परिसरातील एका गावात हेमराज भोजू चौधरी (वय ६०) याने एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस डोळ्यात औषध टाकण्याचे बहाणा करुन तिला घरी बोलावुन घेतले. यानंतर हेमराज चौधरी याने पिडीत मुलीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे करीत आहेत.