जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२४ । जळगाव येथील प्रसिध्द अस्थीरोग तज्ञ डॉ. नितीन ए धांडे यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी चक्क प्रिक्सीप्शनचा उपयोग केला आहे.

पारीकपार्क उद्यान येथे रूग्णांची तपासणी करतांना अस्थीरोग तज्ञ डॉ. नितीन धांडे हे स्वता मतदान करण्यासाठी रूग्णांना आवाहन तर करतच आहे पण घरी गेल्यावर विसर पडू नये म्हणून औषधी लिहून दिलेल्या केसपेपरवर मतदान हा आपला हक्क आहे त्याचा उपयोग करा मी मतदान करणार असे घोषवाक्य लिहून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रचार व प्रसार करीत आहे.

हा केसपेपर मेडीकल स्टोअर्स व अनेक ठीकाणी हाताळला जात असल्याने डॉक्टरांनी ही नामी शक्कल लढवली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे वैद्यकिय क्षैत्रातून स्वागत केले असून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.