⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

रुस्तमजी इंटरनॅशनल शाळेत ८ ते १० एप्रिलदरम्यान छात्र संसदचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२२ । लोकसभा, राज्यसभा व विधानसभाबद्दल विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त जाणीव व्हावी, यासाठी रुस्तमजी इंटरनॅशनल स्कुल, झिरो अवर फाऊंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशन व जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छात्र संसद ८ ते १० एप्रिल दरम्यान रुस्तमजी इंटरनॅशनल स्कुल येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक विराफ पेसूना यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

पेसूना पुढे म्हणाले की, छात्र संसदेत शहरातील व जिल्ह्यातील सर्व शाळांमधील ७ ते १२ वी’च्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार असून यासाठी केवळ १ हजार शुल्क आहे. आतापर्यंत ७० हुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांची सर्व सोय रुस्तमजी स्कुलतर्फे करण्यात येणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्रात प्रथमच राबविला जात असून यामुळे विध्यार्थ्यांना विविध सामाजिक व राजकीय प्रश्नावर भाष्य करण्याची संधी मिळाणार आहे. उदघाटन ८ एप्रिल रोजी संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान होणार असून यात राजनैतिक जगातील मान्यवर उपस्थित राहतील. तर १० एप्रिल रोजी संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान समारोप सभारंभ आयोजित केला आहे. ज्यात सर्व विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विराफ पेसुना, फॉउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कुणाल शर्मा, युवाशक्ती फॉउंडेशनचे विराज कावडिया उपस्थित होते.

मसुदा मंत्रालयात सादर होणार

भाग घेतलेल्या विद्यार्थ्यंना लोकसभा, राज्यसभा व प्रेस या तीन गटामध्ये विभागले जाणार आहे. त्यानंतर त्यांना सत्ताधारी गटाचे किंवा विपक्षाचे प्रतिनिधी म्हणून नेमले जाणार आहे. या प्रतिनिधींना एका विशिष्ट राजकीय किंवा सामाजिक विषयावर चर्च करून निकषापर्यंत पोहचण्यासाठी त्यांच्या बाजूने मसुदा तयार करून तो राज्यातील मंत्रालयात सादर केला जाणार आहे.