⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

ब्रह्माकुमारी उषादिदींच्या प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर ब्रह्माकुमारी उषादिदी यांचे जिल्ह्यात विविध ठिकाणी दि २२ ते २६ एप्रिल दरम्यान प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी संध्याकाळी ६.३० वाजता चोपडा तालुक्यातील मोहिंदा येथे ‘गीता की वर्तमान समय में व्यावहारिकता’ या विषयावर, शनिवारी ब्रह्माकुमारीज् चोपडा सेवा केंद्रात मेडिटेशन कुटियाचे उद्घाटन आणि सकाळी १० वाजता डॉक्टरांसाठी ईजी मेडिटेशन फॉर बीझी पीपल्स तर ब्रह्माकुमारी चोपडा सेवा केंद्राच्या प्रांगणात संध्याकाळी ६.३० वाजता सुखशांती तथा सफलता का मूलमंत्र या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवारी सकाळी ८ वाजता एरंडोल येथील ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या आत्मानुभूती सेवा केंद्राचे उद‌्घाटन, काबरे विद्यालयाच्या प्रांगणात संध्याकाळी ६.३० वाजता समय की पुकार सकारात्मक जीवनशैली या विषयावर व्याख्यान तर सोमवारी सकाळी ९ वाजता ब्रह्माकुमारीज् धरणगाव येथे राजयोग व्याख्यान, संध्याकाळी ५ वाजता वाघळूद आणि पिंप्री येथे भेट, आणि मंगळवारी सकाळी ९ वाजता कानळदा येथे ब्रह्माकुमारीज् सेवा केंद्र दिव्य प्रकाश भवनचे उद‌्घाटन व कर्म की गुह्यगती विषयावर व्याख्यान, संध्याकाळी ६.३० वाजता जळगाव येथील कांताई सभागृहात जीवन में सुख को एक अवसर दो या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ब्रह्माकुमारी मीनाक्षी दिदी, ब्रह्माकुमारी मंगलादिदी, ब्रह्माकुमारी नीतादिदी, ब्रह्माकुमारी पुष्पादिदी, ब्रह्माकुमारी सीमादिदी यांनी केले आहे.