---Advertisement---
नोकरी संधी

जळगावातील बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर! 175 पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२३ । जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध आस्थापनावरील १७५ रिक्त पदांवर काम करण्याची संधी चालून आली आहे. कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाच्या वतीने २० व २१ जुलै कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात तरूणांनी सहभागी व्हावे. असे आवाहन सहायक आयुक्त ‍वि.जा.मुकणे यांनी केले आहे.

rojgar fair jpg webp webp

नोकरी इच्छुक उमेदवारासाठी ही सुवर्णसंधी आहे. इयत्ता १० वी , १२ वी, पदवीधारक, डिप्लोमा मॅकनीकल, एम.बी.ए, बी. ई. मॅकेनिकल ट्रेड अर्हता असलेले तरूण या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात.

---Advertisement---

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करणे आवश्यक आहे. सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्ड ने लॉग-इन करून अॅप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही. त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करावी व तदनंतर आपल्या युजर आयडी व पासवर्ड ने लॉग-इन करुन ॲप्लाय करावा.

याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते संध्या ६.१५ या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२५७ – २९५९७९० वर संपर्क साधावा. असे आवाहन ही श्री.मुकणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---