⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचार्‍यांची 19 जुलैपासून बेमुदत संपाची हाक

ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचार्‍यांची 19 जुलैपासून बेमुदत संपाची हाक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२१ । देशभरातील आयुध निर्माणींचे निगमीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने कामगार संतप्त झाले असून फेडरेशनने 19 जूलैपासून अनिश्चितकालीन संपाचा इशारा दिला आहे. भुसावळ व वरणगाव आयुध निर्माणीसह देशातील 75 हजार कामगार या संपात सहभागी होतील.

संपाचा एकमताने निर्णय

देशातील सुरक्षेसाठी लागणारा विभिन्न प्रकारचे अस्त्र, शस्त्र, दारुगोळा पुरवणारी अग्रणी आयुध निर्माणीचे निगमीकरणाचे निर्णया विरोधात संरक्षण विभागाच्या तिन्ही प्रमुख फेडरेशनने विरोध दाखवला आहे. एआयडीईएफ, आयएनडीडब्लूएफ व बीपीएमएस या संघटनांनी बैठकीत संपाबाबत एकमताने निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयुध निर्माणी चे सर्व संरक्षण कर्मचारी जवळपास 75 हजार कर्मचारी 19 जुलैपासून अनिश्चितकालीन संपावर जातील.

संपासाठी अधिकृत नोटीस 1  जुलै  रोजी संरक्षण मंत्रालय यांना सोपवण्यात येईल. यापूर्वी  तत्पूर्वी तिनही फेडरेशनद्वारे 23 जून रोजी अधिकृत अधिसूचना संरक्षण मंत्रालयाला देण्यात येईल, अशी माहिती संयुक्त संघर्ष समितीचे दिनेश राजगिरे यांनी दिली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.