---Advertisement---
जळगाव जिल्हा

मोठा निर्णय: ३१ मार्चपर्यंत जळगावातील शासकीय व्यवहार रात्रीपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२५ । जळगाव जिल्ह्यातील शासकीय कामकाजाला गती देण्यासाठी आणि आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसांमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत जळगाव जिल्ह्यातील शासकीय व्यवहार रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे. दिनांक 31 मार्च 2025 सोमवार या दिवशी रमजान ईद निमित्त सार्वजनीक सुट्टी असल्याने शासकीय व्यवहार करणाऱ्या बँकांसाठी आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.

ayush prasad jpg webp

या आदेशानुसार, भारतीय स्टेट बँकेची मुख्य शाखा, जळगाव आणि जिल्ह्यातील तालुका मुख्यालयातील उपकोषागार शासकीय व्यवहारासाठी अधिकृत स्टेट बँकेच्या शाखा ३१ मार्च २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच, ३० आणि ३१ मार्च रोजी सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा कोषागार कार्यालये आणि शासकीय व्यवहार करणाऱ्या बँका कार्यालयीन कामकाजासाठी सुरू राहणार आहे.

---Advertisement---

३१ मार्च रोजी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी कोषागार/उपकोषागार सुरू असेपर्यंत मुख्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. उपकोषागार कार्यालये ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेनंतर देयक स्वीकारणार नाहीत. सुधारित अंदाजपत्रक आणि पुरवणी मागणीतून मिळालेल्या अनुदानातून वैयक्तिक लाभाची मोठी देयके उपकोषागारात सादर न करता जिल्हा कोषागारात सादर करावीत. अशा सुचना आदेशात देण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment