⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावात रुग्णवाहिकेच्या स्फोटाची प्रशासनाने घेतली दखल; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

जळगावात रुग्णवाहिकेच्या स्फोटाची प्रशासनाने घेतली दखल; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२४ । जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर खोटे नगर जवळ 13 नोव्हेंबर रोजी रात्री 108 या रुग्णवाहिकेला आग लागली. तात्काळ रुग्णवाहिकेतील रुग्णाना खाजगी वाहनाने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कोणालाही इजा अथवा दुखापत झालेली नाही. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तात्काळ याची माहिती घेवून पोलिस विभागाला घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले,परिवहन विभागाचे पथक ही घटनास्थळी पोहोचले, सर्व बाजुनी चौकशी केली जात आहे. ही रुग्णवाहिका फोर्स या कंपनीकडून बनविलेली आहे. फोर्स मोटरचे टीम पण जळगाव साठी रवाना झालेली आहे आणि ते पण या तपास मध्ये परिवहन आणि पोलीस विभागाला मदत करणार आहे आणि त्याच्याशिवाय 108 रुग्णवाहिका व्यवस्थापनालाही बोलवून घेण्यात आले आहे. ते पण या ठिकाणी येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

या रुग्णवाहिके ऐवजी इतर जिल्ह्यातून दुसरी रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून देण्याची सूचना आरोग्य विभागाला करण्यात आली आहे.ज्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिकेचे प्रमाण पुरेसे राहील आणि जळगाव जिल्ह्यात रुग्णवाहिकेची कमतरता भासणार नाही. त्यानुसार पर्यायी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत आहे.

घटनास्थळावर अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी भेट दिली असून संपूर्ण घटनेवर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, लक्ष ठेऊन असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.