जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२५ । राज्यात सध्या गारपिटीसह अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असून मंगळवारी (६ मे) जळगाव जिल्ह्यालाही गारपिटीसह वादळी पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान अशातच हवामान विभागाने आज देखील वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा दिला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील आज ऑरेंज अलर्ट दिला आहे.

या जिल्ह्यांना गारपाटीची शक्यता?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जळगावसह पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, जालना, बीड याठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबत गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आलीये. त्यामुळं या भागांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकणातील मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, कोल्हापूर, नंदूरबार, सांगली, सोलापूर या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, मंगळवारी दुपारनंतर जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. यादरम्यान काही ठिकाणी गारपीटदेखील झाली. वादलीमुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी घरांच नुकसान झाल्याचं पाहायला मिळालंय. तर यामुळे शेती पिकांचे देखील अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे