जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरी मिळावी, यासाठी तरुण-तरुणी अहोरात्र मेहनत घेत आहे. यापैकी तुम्हीही असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. विशेष महाराष्ट्रात सरकारी नोकरी मिळविण्याची संधी तुमच्यासाठी आहे. कारण कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी भरती सुरूय.

या भरती मोहिमेत एकूण 2795 पदे भरली जाणार असून, निवड झाल्यास उमेदवारांना दीड लाख रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार एमपीएससीच्या mpsc.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. 19 मे 2025 पर्यंत अर्ज करता येणार असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेळ वाया न घालवता या भरतीसाठी त्वरित अर्ज करावा.
पदाचे नाव : पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ
पात्रता काय?
या भरतीसाठी उमेदवाराकडे पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन या विषयातील बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया :
उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षणानुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये सवलत दिली जाईल. निवड प्रक्रिया स्क्रीनिंग टेस्ट आणि मुलाखत या टप्प्यांद्वारे होणार आहे. परीक्षेच्या तारखा आणि प्रवेशपत्रे याबाबतची माहिती आयोग स्वतंत्रपणे जाहीर करणार आहे.
पगार किती मिळेल? :
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹56,100 ते ₹1,77,500/- पगार मिळेल
ही वेतनश्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्यात आली असून त्यात विविध भत्त्यांचाही समावेश आहे.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
कसा अर्ज कराल?
सर्वप्रथम उमेदवारांनी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
त्यानंतर ‘ऑनलाइन अर्ज’ विभागात जाऊन संबंधित पदाची लिंक निवडावी.
नवीन नोंदणी करावी आणि लॉगिन करून अर्ज भरावा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी आणि फी भरून अर्ज सबमिट करावा.