⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

ओपन जीमचे वाढीव कामासह जीमला वॉल कंपाऊंड तयार करण्याचा सूचना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील वाल्मिक नगरात शनिवारी ओपन जीमचे उद्घाटन करण्याच्या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी कामाच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर उदघाटनासाठी आलेले आमदार सुरेश भोळे व महापौर जयश्री महाजन यांना या कामाचे उदघाटन न करताच माघारी फिरावे लागले होते. आता या प्रकरणी नागरिकांच्या मागणीप्रमाणे वाढीव कामासह जीमला वॉल कंपाऊंड तयार करण्याचा सूचना मनपाने दिल्या आहेत.

मात्र, हे साहित्य मातीत पुरून तयार केले होते. याठिकाणी सिमेंटचा वापर केला पाहिजे होता. अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली होती. तसेच रंजना सपकाळे यांच्या व्यतिरिक्त प्रभागातील इतर नगरसेवक लक्ष देत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या त्यावर आमदार व महापौरांनी देखील झालेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता या ठिकाणी नागरिकांच्या मागणीनुसार जीमचे साहित्य सिमेंटमध्ये पुरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नगरसेविका रंजना सपकाळे या स्वखर्चातून या जीमच्या वॉल कंपाऊंडचे काम करणार असल्याची माहिती मिळाली आहे. वाल्मिक नगरातील उद्यानात नगरोत्थान योजनेंतर्गत साडे आठ लाख रूपये खर्च करून ओपन जीमचे साहित्य ठेवण्यात आले होते.