⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

Open Challenge : पोलिसांना १० मिनीटे बाजूला करा.. नितेश राणेंचे थेट आव्हान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२२ । एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्रात येऊन औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्याने त्यावरून राजकीय पडसाद उमटले आहेत. ओवैसी यांच्यावर सर्वत्र टीका होत असताना नितेश राणे यांनी तर खुले आव्हानच दिले आहे. राणे यांनी ट्विट करीत पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा, नाही याला औरंगजेबकडे पाठवला तर असे आव्हान दिले आहे.

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्रात येऊन औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्याने मोठे वादंग उठले आहे. शिवसेना नेत्यांसह भाजपकडून ओवेसींवर टीका करण्यात येत आहे. शिवसेना माजी खा.संजय राऊत, अमरावतीचे आ.रवी राणा, मनसेचे गजानन काळे यांच्यासह अनेकांनी जोरदार टीका केली आहे. नितेश राणे यांनी देखील ट्विट करून ओवेसीला आव्हान दिले आहे.

मी आव्हान करतो, पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबकडे नाही पाठवला तर… आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!! असे खुले आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे. सर्वत्र टीका होत असल्याने ओवैसी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार कि नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.