⁠ 

विद्यापीठात ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । येथील विद्यापीठातील उपयोजित भूविज्ञान विभाग आणि औरंगाबाद येथील असोसिएशन ऑफ जिऑलॉजिस्ट अँड हैड्रोजिओलॉजिस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक वसुंधरा दिनानिमित्त राष्ट्रीय ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा नुकतीच पार पडली.

या उपक्रमात भारतातील विविध राज्यामधील सुमारे ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सर्वांना ई-प्रशस्तिपत्रक देण्यात आले. उपक्रमास डॉ. वि. म. रोकडे, प्रा. डॉ. प. स. कुलकर्णी (औरंगाबाद) आणि भावेश दिनू पाटील यांनी नियोजन केले. कुलगुरू डॉ. व्ही. ल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू डॉ. एस.टी. इंगळे, असोसिएशन ऑफ जिऑलॉजिस्ट अँण्ड हैड्रोजिओलॉजिस्ट अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. यू.डी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.