---Advertisement---
जळगाव शहर

सैन्य भरतीबाबत 28 मे ला ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

military recruitment
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ ।  जळगाव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील युवक/युवतींसाठी 28 मे, 2021 रोजी भारतीय संरक्षण दलातील विविध संधी (सैन्यात भरती होण्यासाठी पात्रता) या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन दुपारी 3.30 ते 4.30 या वेळेत करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. राजपाल म. कोल्हे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी दिली आहे.

military recruitment

या मार्गदर्शन सत्रात नारायण पाटील, जिल्हा सैनिक कार्यालय, जळगाव हे मार्गदर्शन करणार आहे. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन गुगल मिटवर करण्यात आले असून सहभाग घेणाऱ्यांना  https://meet.google.com/edq_tiaw_wuv या लिंकवर सहभागी होता येईल.

---Advertisement---

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक/युवतींनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---