जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२१ । इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी-२०२१ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. परीक्षेसाठी ७ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. तर विलंब शुल्कासह ८ ते १५ जुलै यादरम्यान अर्जाची संधी असेल.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. बारावीनंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते.
इंजिनिअरिंग (बीई), फार्मसी (बी. फार्म) तसेच कृषी (बी. एस्सी. अॅग्री) साठी सीईटी घेतली जाते. या परीक्षांसाठी https:/mhtcet2021.mahacet.org या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. परीक्षेची माहिती पुस्तिका राज्य या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.