Parola : खोदलेल्या खड्ड्यात दोन दुचाकी पडल्या; एक जण ठार, दुसरा गंभीर जखमी

सप्टेंबर 13, 2025 10:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या पंचवीस फूट खोल खड्ड्यात दोन दुचाकी पडल्या. या अपघातात एक जण ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला. अशोक एकनाथ कोष्टी (७०, रा. पारोळा), असे ठार झालेल्याचे, तर रोहित राजेंद्र सुतार ( ३०, रा. कासोदा), असे जखमीचे नाव आहे.

image 55 jpg webp webp

भोकरबारी येथून पारोळ्याकडे निघालेले अशोक कोष्टी हे भोकरबारी धरणाजवळील २५ ते ३० फूट खोल खड्ड्यात दुचाकीसह पडले. काही वेळाने रोहित सुतार हेही दुचाकीसह त्याच खड्यात पडले. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले.

Advertisements

अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक आशितोष शेलार यांनी त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. त्यांना प्राथमिक उपचार झाल्यानंतर खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचारादरम्यान अशोक कोष्टी यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत पारोळा पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. खड्डा आणि रोडवर कोणतेही दिशा फलक किंवा सूचनाफलक नसल्यामुळे हा अपघात झाला. धरण परिसरात काम करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now