जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील विहीरफाटा येथे गोळीबार करीत एकाचा खून झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले

धरणगाव तालुक्यातील विहीरफाटा येथे आज दि.२२ एप्रिल रोजी सायकाळी ७.३० ते ८ वाजेदरम्यान काही अनोळखी इसमांनी गोळीबार एका तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाची चक्रे फिरवली आहेत. मयत तरूणाची ओळख पटविण्याचे काम देखील सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.