⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | कपाशीने भरलेला आयशर झाला पलटी ; एक ठार, ८ जण जखमी

कपाशीने भरलेला आयशर झाला पलटी ; एक ठार, ८ जण जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । कपाशीने भरलेला आयशर ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात एका मजुराचा जागेवरच मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाल्याची घटना जामनेर-जळगाव रस्त्यावर घडलीय. दरम्यान, जखमीपैकी २ जणांंना प्राथमिक उपचार देवुन जळगाव येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.

याबाबत असे की, कपाशीने भरलेला आयशर ट्रक(एम.एच.२८-बी.२७५४) हा जामनेर- जळगाव रस्त्यावर औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ अचानक उलटला. त्यावेळी ट्रकच्या केबीनवर ८ ते १० मजुर बसलेले होते.  यात एका मजुराचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहे. समाधान भगवान साबळे(वय-६०) हे गाडीखाली दबल्याने जागीच ठार झाले.

तर फिरोज खान नवाब खान, अनिल नामदेव कापसे, युवराज सिताराम कचरे, आकाश रामसिंग राजपुत, गोपाल विष्णु सोनवणे, प्रकाश शामराव माळी, विलास भागवत चौरे, दत्तात्रय शालीग्राम चौधरी हे या अपघातात जखमी यापैकी २ जखमी मजुरांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार देवुन पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रूग्णालयात रवाना करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मयत व जखमींना बघण्यासाठी नातेवाईकांनी रूग्णालयात जखमींना उपचारासाठी मदत मिळवण्यासाठी घेतली. जामनेर पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.