जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२३ । जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात भरधाव टँकरने एकाला चिरडल्याची दुर्घटना आज मंगळवारी घडली. या प्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मृत मोटारसायकलस्वाराची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, जळगाव शहरातील आधीच अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यात शहरातील आकाशवाणी चौकात महामार्गाच्या मध्यभागी चुकीच्या पध्दतीत सर्कल केल्यानंतर अनेक लहानमोठे अपघात येथे कायम होत असतात. यात अनेकांचे प्राण गेले आहेत. गेल्या महिन्यात येथे एकाचा मृत्यू झाला होता. यानंतर आज पुन्हा डंपरने चिरडल्याने एकाला प्राण गमवावे लागले आहेत.
जळगावहून धुळ्याकडे जाणार्या भरधाव टँकरने मोटारसारकला धडक दिली. यात मोटारसारकलस्वार हा टँकरच्या मागील चाकात आल्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून या प्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मृत मोटारसायकलस्वाराची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.