जळगाव लाईव्ह न्यूज । पालपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरघाटात मजुरांना घेऊन पिकअप उलटी झाल्याने अपघात झाला. या अपघातात १ ठार तर २१ मजूर जखमी झाले आहेत. यात पाल ग्रामीण रुग्णालय, फैजपूर तसेच जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील मजुर शेती कामासाठी खिरोदा येथे गेले होते. बुधवारी सायंकाळी घरी परत येत असताना बोर घाटात पिकअपचा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच पाल ओपीचे पोलिस कर्मचारी जगदीश पाटील, इस्माईल तडवी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ पाल ग्रामीण रुग्णालय दाखल केले. यावेळी डॉ. उत्कर्षा सात्पुते विश्वासराव, अनिकेत पाटील यांनी उपचार जखमींवर केले. यावेळी पाल येथील ग्रामपंचायत सदस्य प्रदीप जाधव, सामाजिक कार्यकर्ते संजय पवार, गारखेडा येथील सरपंच रतन पावरा, सुरेश पवार, यांनी मदतकार्य केलं.

अपघातात जखमी झालेले मजूर
अपघातात अनिल बारेला (वय २०) हे जागीच ठार झाले. तर भुरीबाई नंदा बारेला वय (१८), लाडकी बाई रिचु भिवाला (३०), नुरलीबाई रिचु भिलाला (५५), सुमली रेमसिंग बारेला (५०), लक्ष्मी बारेला (१६), सेवता बारेला (१५), रूपा बारेला (१६), दयाराम बारेला (२०), पार्वती बारेला, सविता बारेला, आशा बारेला (१५), विकास बारेला (१८), हिरालाल बारेला (३०), सुभाष बारेला (३०), सुरेश भिलाला (१८), ममता बारेला (१५), सामतीबारेला (४५), रंजीता बारेला (१५), मिनूबारेला (४५), शेंगा बारेला (२०) सर्व रा. मालगाव कोठा मध्य प्रदेश हे जखमी आहेत.










