जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि २९ रोजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन कॉमर्स ॲण्ड मॅनेजमेंट या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे प्रत्यक्ष व आभासी या दोन्ही पद्धतीने आयोजन करण्यात आले.
अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयाच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात ही परिषद घेण्यात आली. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी ११ वाजता शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, थायलंडच्या लोकप्रशासन विभागातील डॉ. अरुण चैनीट, अमरावती विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. दिनेश निचेत हे उपस्थित होते. परिषदेसाठी डॉ.अनिल डोंगरे, डॉ. समीर नारखेडे, डॉ. मधुलिका सोनवणे यांचे सहकार्य लाभले.