---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

Jalgaon : गावठी कट्ट्यासह एमआयडीसी पोलिसांनी एकाच्या आवळल्या मुसक्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२५ । गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका संशयिताच्या जळगाव तालुक्यातील कुसुंबा परिसरातून मुसक्या आवळल्या आहे. तुषार अशोक सोनवणे असं अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी गावठी कट्टा, जिवंत काडतुसे आणि दुचाकी जप्त केली. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

tushar sonvne

या घटनेबाबत असे की, कुसुंबा परिसरात तुषार अशोक सोनवणे (रा. खेडी आव्हाणे) नावाचा तरुण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोका. निलिन ठाकूर यांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस नाईक छगन तायडे, किरण पाटील आणि राहुल घेटे यांना घटनास्थळी पाठवण्यात आले.

---Advertisement---

पथक हॉटेल पुष्पा (नशिराबाद रोड) येथे गस्त घालत असताना, हळदी रंगाचा शर्ट घातलेला एक तरुण मोसावर बसलेला आढळला. पोलिस त्याच्या दिशेने जाताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.अटक केल्यानंतर संशयिताची झडती घेतली असता, त्याच्या कमरेत २०,००० रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि २,००० रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे आढळून आली. तसेच, ५०,००० रुपये किमतीची होंडा शाईन दुचाकीही जप्त करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक नितीन ठाकूर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४७/२०२५ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि पोलीस नाईक योगेश बारी करत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment