---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

Jalgaon : माजी उपसरपंचाच्या खून प्रकरणी एकाला अटक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२५ । जळगाव जवळील कासनवाडा गावाचे माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी (वय ३५ रा.) यांचा आज २१ रोजी सकाळी धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तर इतर एकाचा पोलीस शोध घेत आहेत

yuvraj koli

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कानसवाडा उपसरपंच युवराज कोळी हे त्यांची आईवडील यांच्यासोबत कानसवाडा शिवारातील शेतात काम करत होते. त्यावेळी संशयित आरोपी भरात पाटील आणि त्याच्यासोबत असलेले देवा पाटील, हरीश पाटील यांनी येऊन धारदार चाकू आणि चॉपरने युवराज कोळी याच्यावर वार केले. दरम्यान छातीवर केलेल्या गंभीर घावामुळे युवराज जागेवरच कोसळला.

---Advertisement---

त्यावेळी त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे वडील सोपान कोळी आणि आईने देखील धाव घेतली. परंतु देवा आणि हरीश या दोघांनी दोघांना पकडून ठेवले होते. आई-वडिलांच्या डोळ्यादेखत मुलाचा हा खून करण्यात आला. दरम्यान परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांनी घटनांसाठी धाव घेतली. तोपर्यंत भरत पाटील, देवा पाटील आणि हरीश पाटील हे मारेकरी पसार झाले होते. जखमी अवस्थेत असलेल्या युवराज कोळी तातडीने खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मयत घोषित केले. मुलाच्या मृत्यूची वार्ता करताच त्याच्या आई आणि वडिलांनी टाहो फोडला. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगी यांनी देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले.

युवराज कोळी हे शिंदे गटाचे कार्यकर्ते असून कानसवाडा गावाचे माजी उपसरपंच होते. कार्यकर्त्याचा खून झाल्याचे कळल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन नातेवाईकांची भेट घेऊन कुटुंबाचे सांत्वन केले. दरम्यान या संदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी भरत पाटील याला अटक करण्यात आली आहे तर उर्वरित दोघांचा शोध घेणे सुरू आहे.

याच्या छातीत धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. या खुनाच्या प्रकरणांमध्ये भरत पाटील याच्यासह त्याच्या मुलांचा यामध्ये सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना झाल्यानंतर भरत पाटील पोलिसांच्या हाती लागला असून त्याची दोन्ही मुले पाटील व देवा पाटील अजूनही फरार आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की एका आरोपीला अटक करण्यात आलेली असून संध्याकाळपर्यंत दोघा संशयितांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment