⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | गुन्हे | २६ कोटीचा GST कर चुकवणाऱ्या एकास अटक

२६ कोटीचा GST कर चुकवणाऱ्या एकास अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२३ । वस्तू व सेवा कर विभागाच्या वतीने विशेष मोहीमे अंतर्गत ११९ कोटींची खोटी देयके सादर करून २६ कोटींची करचोरी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती वस्तू व सेवा कर विभागाच्या जळगाव विभागाचे राज्यकर सह आयुक्त सुभाष भवर यांनी दिली आहे.

बनावट बिलांच्या विक्रीमध्ये सहभागी असलेल्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून जळगाव येथील मे.अग्रवाल असोसिएटसची चौकशी करण्यात आली. यामध्ये मे.अग्रवाल असोसिएटसचे मालक नैनेश संतोष अग्रवाल यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता खोटी बिले देऊन बनावट कर वजावटीचा पुरवठा केला.

या प्रकरणात नैनेश अग्रवाल याला अटक होऊन १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने पुन्हा एकदा करचोरी करणाऱ्यांना आणि बनावट पावत्या जारी करणाऱ्या आणि बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा आणि पासिंग करणाऱ्या व्यक्तींना कठोर इशारा दिला आहे.

नाशिक परिक्षेत्राचे अपर राज्यकर आयुक्त सुभाष एंगडे, जळगाव विभागाचे राज्यकर सहआयुक्त सुभाष परशुराम भवर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अन्वेषण शाखेचे राज्य कर उपायुक्त महेंद्र शिंदे, सहायक राज्यकर आयुक्त माहूल संजयकुमार इंदानी, यांच्या नेतृत्वाखाली रविंद्र पोटे सहायक राज्यकर आयुक्त, राज्यकर निरीक्षक व कर सहाय्यक यांनी ही कारवाई अंमलात आणली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.