सॉफ्टबॉल संघ निवड समितीवर डॉ. प्रदीप तळवेलकर यांची नियुक्ती
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । भारतीय महिला सॉफ्टबॉल संघाच्या निवड समितीवर ला.ना.शाळेचे क्रीडा शिक्षक डॉ. प्रदीप तळवेलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सॉफ्टबॉल फेडरेशनच्या अध्यक्षा नितल नारंग व पदाधिकाऱ्यांकडून ही निवड करण्यात आली आहे.
१९ वी एशियन गेम्स २०२२ हंगझुवू (चायना) येथे होणार आहे. स्पर्धेत भारतीय महिला सॉफ्टबॉल संघ सहभागी होणार असून महिला संघाची दुसरी निवड चाचणी इंदौर येथे २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान आयोजित केली जाणार आहे. दरम्यान, भारतीय महिला सॉफ्टबॉल संघाच्या निवड समितीवर ला.ना. शाळेचे क्रीडा शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनचे सचिव, शिव छत्रपती क्रीडा राज्य पुरस्कारप्राप्त डॉ. प्रदीप तळवेलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सॉफ्टबॉल फेडरेशनच्या अध्यक्षा नितल नारंग, सचिव एल.आर.मौर्य, सीईओ डॉ.प्रवीण अनावकर यांनी ही नियुक्ती केली आहे.
डॉ. तळवेलकर यांच्या या निवडीबद्दल आ.गिरीश महाजन, माजी आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ.राजुमामा भोळे, पी.ई. तात्या पाटील, प्रशांत जगताप, मुख्याध्यापक दुर्गादास मोरे, अरुण श्रीखंडे, सचिन जगताप, प्रा. विजय पवार, नाना वाणी, अरविंद राणे आदींनी अभिनंदन केले आहे.