जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२३ । यावल तालुक्यातील विरावली गावातील रहिवासी ॲड देवकांत पाटील यांच्या मुलाचा विराजचा पहिला वाढदिवस या वाढदिवसाचे अवचित साधुन वाढदिवसानिमित्त विरावली गावातील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक असणारे संगणकाची गरज ओळखून वाढदिवसाला केक जेवण इतर अनावश्यक खर्च न करता शाळेला संगणकाचा सेट भेट दिला.
या कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष यांनी आपल्या मनोगता मध्ये ॲड.देवकांत पाटील हे नेहमीच विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबवत असतात त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी यावेळीही आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेतील गावातील शाळेला संगणक भेट देत आहे असे सांगत विराज ला जन्म दिवसाच्या शुभेच्छा रुपी आशिर्वाद दिले.
याप्रसंगी शाळेच्या उपशिक्षिका प्रियांका तायडे मॅडम व शाळेतील विध्यार्थ्यांनी पाटील कुटुंबा ने दिलेला संगणक स्वीकारला या कार्यक्रमाला पाटील कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते त्याचबरोबर मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अजय पाटील स्वराज्य फोटो स्टुडिओ चे संचालक हेमराज पाटीलभाऊ, गोलू माळी ,विनोद पाटील विरवली विकास सोसायटीच्या व्हा.चेअरमन नरेंद्र सोनवणे, प्रल्हाद पाटील ,संजय पाटील लीलाधर सोनवणे ,पवन पाटील गिरीश पाटील, आदींची याप्रसंगी उपस्थिती होती संगणकाची भेट मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने प्रियंका तायडे मॅडम यांनी देवकांत पाटील व त्यांच्या परिवाराचे आभार मानले .