जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२३ । २६ जुलै रोजी कारगिल विजयदिनानिमित्त यावल येथील माजी सैनिक रघुनाथ फिरके यांचा गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका युवा नेत्या डॉक्टर केतकीताई पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
रघुनाथ फिरके हे भारतीय लष्करात 1966 साली भरती झाले. त्यांनी जम्मू काश्मीर, सिक्कीम (नथुला), बांगलादेश येथे आपली कार्यकीर्त गाजवली. 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात ते बांगलादेशात कार्यरत होते. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान अर्थात बांगलादेश आणि पाकिस्तान याच्या विभाजनाचे ते साक्षी आहेत.
याच काळात त्यांना प्रमोशन देऊन ‘बटालियन हवलदार मेजर’ करण्यात आले. त्यांनी त्यांच्या आयुष्यात पाकिस्तान मध्ये गुप्तहेर म्हणून अतिशय कार्यतत्पर आणि सावधगिरीने भुमिका बजावत तेथील अनेक रहस्ये भारतीय लष्करास पुरविले, ह्या त्यांच्या अतिशय उत्तुंग आणि समर्पित कार्याबद्दल आज युवा नेत्या डॉ.सौ. केतकीताई पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांचे चिरंजीव, सुनबाई,त्यांचे नातेवाईक किशोर महाजन यांची उपस्थित होते.