---Advertisement---
गुन्हे पाचोरा पारोळा

बापरे : तो मासे विकायला आला, पाणी मागितले, घरात घुसला आणि विवाहितेसोबत केले…

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२२ । आजच्या कलियुगात कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही हेच कळेना झाले आहे. एखाद्याला माणुसकीच्या नाते पाणी पाजणे देखील अंगाशी येऊ शकते याचा प्रत्यय नुकतेच एका विवाहितेला आला आहे. गल्लीत मासे विक्रीसाठी आलेल्या एका विक्रेत्याने महिलेला खरेदीसाठी विचारणा केली. महिलेने नकार दिला असता त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. महिला पाणी घेण्यासाठी घरात गेली असता त्याने महिलेला पकडून तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. महिलेने स्वतःची सुटका करताच त्याने पळ काढला.

Vinaybhang 354 jpg webp

पारोळा तालुक्यातील शिरसमणी गावात २९ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह राहते. दि.२ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास एक मासे विक्रेता त्यांच्या गल्लीत आला. महिलेला ताई, मासे हवे का? अशी विचारणा केली. महिलेने पतीला फोन करून याबाबत विचारणा केली असता त्यांनी नकार दिला. महिलेनं मासे विक्रेत्याला नकार कळविल्यानंतर त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. महिला घरात गेली आणि त्याला पाणी दिले.

---Advertisement---

पाणी पिल्यानंतर मासे विक्रेत्याने महिलेला मोबाईल नंबर मागितला. महिलेने नकार देताच मासे विक्रेत्याने महिलेला पकडून तिचे तोंड दाबले आणि तिच्यासोबत जबरदस्ती करू लागला. महिलेने कशीबशी स्वतःची सुटका करीत पतीला फोन लावला. महिलेने फोन लावताच त्याने लागलीच पळ काढला. पती घरी आल्यावर तिने त्याचे वर्णन आणि घडलेला प्रकार सांगितला. तसेच महिलेने तिच्या भावाला देखील मासे विक्रेत्याचे वर्णन कळविले.

वर्णनावरून आणि गावात नेहमी येत असल्याने त्याचा शोध घेतला असता मासे विक्रेत्याचे नाव शंकर अशोक भोई रा.नगरदेवळा, ता. पाचोरा असल्याचे समजले. मासे विक्रेत्याची संपूर्ण माहिती मिळाल्यावर पारोळा पोलिसात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार दीपक वाघ करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---