---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे धरणगाव

मोठी बातमी ! दीड हजाराची लाच घेताना अधिकारी जाळ्यात, जळगाव एसीबीची कारवाई

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२५ । वर्क ऑर्डर काढण्यासाठी दिड हजारांची लाच घेताना धरणगावच्या मनरेगा पंचायत समितीमधील सहाय्यक कार्यक्रम अधिकार्‍याला जळगाव एसीबीने कार्यालयातच रंगेहात अटक केल्याने खळबळ उडाली. प्रविण दिपक चौधरी (वय- 39 वर्ष) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तसेच तक्रारदार यांना लाच रक्कम देण्यासाठी प्रोत्साहीत केले म्हणून तांत्रिक सहाय्यक उमेश किशोर पाटील, वय 36 याला देखील अटक केली.

lach jpg webp webp

याबाबत असे की, तक्रारदार यांना त्यांचे शेत शिवारात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गोठा शेड तयार करण्याचा कार्यारंभ आदेश देण्याचे मोबदल्यात प्रवीण चौधरी यांनी तक्रारदार यांचेकडे 2000 रू लाचची मागणी करून , तडजोडी 1500/- रू लाच रक्कम स्विकारली . तसेच आरोपी उमेश पाटील याने प्रवीण चौधरी यांचे सांगणे प्रमाणे गोठा शेड बांधकाम करण्याच्या जागेची आखणी करून सदर जागेचे जीपीएस प्रणालीद्वारे फोटो काढण्यासाठी तक्रारदार यांचे शेतात जाण्याकरिता पेट्रोल पाण्याचे नावाखाली तक्रारदार यांचेकडून पैसे स्विकारण्यास कोणताही विरोध न दर्शवता मुक संमती दर्शवून तक्रारदार यांना लाच रक्कम देण्यासाठी प्रोत्साहीत केले म्हणून त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

---Advertisement---

याबाबत धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment