जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२५ । भारतात ऑक्टोबर हा सण-उत्सवांचा महिना आहे. आणि यंदाच्या 2025 च्या ऑक्टोबरमध्ये नवरात्र ते दसरा, दिवाळी, भाऊबीज आणि छठ पूजा असे अनेक सण आहेत. यामुळे ऑक्टोबर महिन्यात सरकारी सुट्ट्या असणार आहे. ऑक्टोबर महिन्यात जवळपास २१ दिवस बँका बंद असणार आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयच्या गाईडलाईननुसार, वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक सणांमुळे बँका बंद राहतील. त्यामुळे जर तुमची बँकेत काही कामे असतील तर सुट्ट्यांची यादी नक्कीच वाचून जा.

ऑक्टोबरमध्ये बँकांच्या सुट्ट्यांची यादी
१ ऑक्टोबर- महानवमीनिमित्त बिहार, झारखंड, कर्नाटक,केरळ, मेघालट, नागालँड, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, पश्चिम बंगाल येथे सुट्टी असणार आहे.

२ ऑक्टोबर- गांधी जयंतीनिमित्त देशातील सर्व बँका बंद
७ ऑक्टोबर- महर्षिक वाल्मिकी जयंतीनिमित्त दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगड आणि हिमाचल प्रदेशमधील बँका बंद
१७ ऑक्टोबर- करवा चौथनिमित्त पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्लीत बँकांना सुट्ट्या
२० ते २३ ऑक्टोबर- दिवाळी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, भाऊबीजनिमित्त अनेक राज्यात बँका बंद
२७-२८ ऑक्टोबर-छठ पूजानिमित्त बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, दिल्लीत बँकांना सुट्ट्या
३१ ऑक्टोबर- काली पूजानिमित्त पश्चिम बंगाल, सरदार पटेल जयंतीनिमित्त गुजरात तर दिवाळीनिमित्त दिल्लीत सुट्ट्या
ऑक्टोबर महिन्यात बँका जरी बंद असल्या तरीही ऑनलाइन सेवा सुरु राहणार आहे. नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग अॅप हे सुरु असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्त अडचण यायची नाही. परंतु अनेक कामे ही बँकेत जाऊनच करावी लागतात. त्यामुळे तुम्ही


