जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । बारावी विज्ञान शाखा, व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना जात पडताळणी आवश्यक असते हे प्रकरण वैध झाल्याची माहिती आता विद्यार्थ्यांना मोबाइलवर एसएमएसद्वारे मिळणार आहे.
तसेच अर्जामध्ये असलेल्या त्रुटींची माहिती देखील जिल्हा जात पडताळणी समितीकडून ई-मेलने कळवण्यात येणार आहे.
बारावी विज्ञान शाखेत असलेले विद्यार्थी साईटी देतील. त्यामुळे पदविका तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची जात पडताळणीची प्रकरणे ३० एप्रिलपर्यंत सादर करावीत. अर्जामध्ये त्यांचा ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करावा. प्रकरण ऑनलाईन सादर केल्यानंतर हार्ड कॉपी १५ दिवसांच्या आत समिती कार्यालयात द्यावी, असे जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य सचिव बी. यू. खरे यांनी कळविले आहे.