---Advertisement---
जळगाव शहर

जळगावकरांना सूचना : उद्यापासून शहरात ‘नो वॅक्सीन, नो पेट्रोल’

jalgaon manapa
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी व लसीकरण वाढावे यासाठी महापालिका प्रशासनाकडून कठोर पाऊले उचलण्यात येत आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच पेट्रोल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे आदेश शहरातील सर्व पेट्रोलपंप चालकांना महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

jalgaon manapa

कोविड-१९ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनस्तरावरून कार्यवाही करण्यात येत आहे. जळगाव शहरातही महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडून नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या काही दिवसात महापालिकेकडून नेमण्यात आलेल्या पथकाकडून कारवाई करण्यात येऊन दंड देखील करण्यात आला आहे. जळगाव शहरात केवळ ५० टक्के नागरिकांचेच लसीचे दोन्ही डोस झालेले झालेले आहेत. त्यामुळे उर्वरित नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे, यासाठी देखील मनपा प्रशासनाने आता पाऊले उचलली आहेत.

---Advertisement---

दोन्ही डोस घेतलेल्यांनाच पेट्रोल
जळगाव शहरातील केवळ ५० टक्के नागरिकांचे दोन्ही डोस लसीकरण झाले आहे. त्यामुळे कोविड-१९ ओमिक्रोन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण त्वरित करून घेणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने पेट्रोल पंपावर येणाऱ्या सर्व ग्राहकांची प्रवेश करण्यापूर्वी लसीकरणाचे दोन्ही डोसचे प्रमाणपत्र तपासणी करावी. प्रमाणपत्र तपासणी करण्यासाठी तसेच अंमलबजावणी होण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नेमणूक करावी. लसीकरण प्रमाणपत्र असणाऱ्या नागरिकांनाच पेट्रोल भरणा करून द्यावा, अशा सूचना उपायुक्त शाम गोसावी यांच्याकडून शहरातील सर्व पेट्रोलपंप चालकांना देण्यात आल्या आहेत. आदेशाची अंमलबजावणी तपासणीसाठी मनपाकडून स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये ५० हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मनपा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

शहरात ५० टक्के नागरिकांचेच लसीकरण
लसीकरण प्रमाणपत्र तपासा हे शासनानेच घोषित केले आहे. जळगाव शहरात केवळ ५० टक्के नागरिकांचेच लसीकरण झाले आहे. तिसरी लाट आली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे लसीकरण वाढविण्यासाठी पेट्रोलपंपावर तपासणी करत आहोत. यासाठी आरोग्य आणि अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची ४ पथके नेमण्यात आली आहेत. बँकांनाही सूचना दिल्या आहेत. त्यांनी त्यांच्या सिक्युरिटी गार्डमार्फेत बँकेत प्रवेश करण्यापूर्वी लस घेतली आहे की नाही याची तपासणी करावी.
– शाम गोसावी, उपायुक्त, जळगाव शहर महानगरपालिका

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---