---Advertisement---
नोकरी संधी

नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये सरकारी नोकरीची संधी; १०वी/आयटीआय उत्तीर्ण अर्ज करू शकतात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये दहावी आणि आयटीआय पास तरुणांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. Northern Coalfields Limited

coal india

या भरतीतून एकूण 200 पदे भरायची आहेत. या नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट nclcil.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागेल. ज्यासाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच १७ एप्रिल २०२५ पासून सुरू होत आहे. तर ऑनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 10 मे 2025 निश्चित करण्यात आली आहे.

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) टेक्निशियन फिटर (ट्रेनी) कॅटेगरी III 95
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT/SCVT (Fitter)
2) टेक्निशियन इलेक्ट्रिशियन (ट्रेनी) कॅटेगरी III 95
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT/SCVT (Electrician)
3) टेक्निशियन वेल्डर (ट्रेनी) कॅटेगरी III 10
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT/SCVT (Welder)

अर्ज फी : अर्ज भरण्यासोबतच, अनारक्षित/OBC(NCL)/EWS श्रेणीतील उमेदवारांना 1180 रुपये (जीएसटी शुल्कासह) परीक्षा फी जमा करावे लागतील. SC/ST/ESM/PWBD श्रेणीतील उमेदवार या भरतीसाठी विनामूल्य अर्ज करू शकतात.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

उमेदवाराचे किमान वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वरच्या वयात सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया
या भरतीमध्ये निवड होण्यासाठी, उमेदवारांना संगणक आधारित परीक्षा द्यावी लागेल. उमेदवारांना परीक्षेतील कामगिरीच्या आधारावरच रिक्त पदांवर नियुक्त केले जाईल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment